अभिप्राय
मनाला आणि बुध्दीला भावणारा
ग्रंथ
ज्योतिष ! अनेकांना कुतूहल असणारा, काही जणांना गम्य असलेला तर काहींना साध्य झालेला विषय. या विषयावर फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम या मालिकेतील “पंचमहाभूते व ग्रह” हा पहिलाच खंड वर उल्लेख केलेल्या प्रत्येक प्रकारातील वाचकाला अतिशय सोप्या व तरीही रंजक अशा लेखनशैलीने विचार करायला प्रवृत्त करतो. ज्योतिषशास्त्र तयार कसे झाले या अगदी मूलभूत शंकेपासून ते ग्रह म्हणजे काय? ते कसे परिणाम करतात. पंचमहाभूते, या प्रत्येक तत्वाचे अप्रतिम विवेचन, त्यांचे एकमेकांशी असणारे संबंध, ग्रहांचे कारकत्व आणि प्रत्येक ग्रहाची आपल्याला होणारी ओळख ही मनातल्या, डोक्यातल्या अनेक “का ?” ची उत्तरं आपल्यासमोर उलगडत जाते. आपल्याला अभ्यासाला प्रवृत्त करते, पुढील खंडाची उत्सुकता वाढवते. हे या खंडाचं आणि लेखकांचं मोठ्ठं यश. संग्रहात असावा आणि पुन्हापुन्हा समजावून घ्यावा असा ग्रंथ.

Milind Pathak
ज्योतिष शास्त्र हा आरसा
आहे
आपल्या पुस्तकाचे दोन्ही खंड अप्रतिमच आहेत. परंतु आता डिटेल मध्ये वाचायला घेतले. पाच तत्त्वांचे एकमेकाशी संबंध हे प्रकरण वाचते आहे ,ते इतकं ऑसम आहे की आपल्याला अभिप्राय दिल्याशिवाय राहवले नाही. जरी आत्ता आपण पत्रिका बघत नसलो तरी आपल्या कुटुंबीयांच्या पत्रिका माहीत असतात त्यांच्याशी आपोआप ह्याची सांगड घातली जाते . ती एवढी चपखल बसली की प्रभावित व्हायला झाले. आपण फारच सखोल चिंतन व संशोधन करून ही पुस्तके लिहिले आहेत यात वादच नाही त्यामुळे पुढील खंडांची आतुरतेने प्रतीक्षा आहे. आपल्या व समोरच्या डीएनए मध्येच काय प्रॉब्लेम आहे तेही कळते. आपले दोष सुधारण्याचा प्रयत्न करता येत समोरच्याच्या सायकॉलॉजी चा विचारही करता येतो व त्याप्रमाणे त्याच्याशी वागण्याचा प्रयत्न ही करता येतो हे ज्योतिष शास्त्र हा आरसा आहे. आपल्याला खरे काय ते दाखवतो व त्यानुसार सुधारण्याचा प्रयत्न ही करता येतोय सध्या हे झालं तरी खुप आहे.

Abhaya
ज्योतिष शास्त्राचे खरे ज्ञान प्रदान करणारा ग्रंथ.
ज्योतिष या विषयाचे अतिशय साध्या सोप्या भाषेत उत्तम विश्लेषण व ज्योतिष शास्त्रीय नियमांमागील किंवा ग्रहयोगांमागील खरी कारणे उलगडवून दाखवणारा असा हा ग्रंथ आहे. ज्योतिष विषयात अगदी नवीन असो किंवा पारंगत असो, कोणीही खरा ज्योतिष प्रेमी असो त्यांच्यासाठी सरांचे सर्वच ग्रंथ हे अमूल्य मार्गदर्शन करणारे आहेत. एखादा चातक पक्षी जशी पावसाची वाट आतुरतेने बघत असतो त्याचप्रमाणे, सरांचे ग्रंथरूपी ज्ञानाचा पाऊस अनुभवून झालेले सर्व ज्योतिष चातक हे त्यांच्या पुढील ग्रंथांची वाट नेहमीच पाहत असतात. त्यातीलच हा एक महत्वाचा खंड.

Sudarshan Mahajan