About Us
कोदंड पुनर्वसु
‘कोदंड पुनर्वसु’तर्फे प्रसारित केल्या जाणाऱ्या, ज्योतिष, अध्यात्म, खगोलशास्त्र, मानसशास्त्र, कविता, भाषा, उत्तम पुस्तकांची माहिती इ. विविध विषयांवरील सर्व पोस्ट्स् या वेबसाईटवर एकाच ठिकाणी तुम्हाला पाहता-वाचता येईल.
‘शुद्ध व अनुभूतीपूर्ण ज्ञानाचा प्रसार’ व्हावा हेच या वेबसाईटचे मुख्य उद्दिष्ट आहे. इथल्या पोस्टस् या अभ्यासपूर्ण व अनुभूतीचा आधार असलेल्या आहेत. शास्त्रीय विषयही सामान्य जनांना समजतील अशा साध्या-सोप्या भाषेत मांडले आहेत. या साऱ्याच्या आधारे अभ्यासकांना व रसिकांना त्यांचे आयुष्य अधिक समृद्ध करता आल्यास आनंद आहे.
इथे येण्याची एकच अट म्हणजे – क्षणभर आपापली सर्व व्यवधाने बाजूस ठेवून, मन झटकून, मुक्त-मोकळ्या मनाने यावे.

कोदंड पुनर्वसु बद्दल
कोदंड पुनर्वसु (श्री. वरदविनायक खांबेटे) यांचा पारंपरिक, कृष्णमूर्ती, भाव-नवमांश, पाश्चात्य ज्योतिष इ. ज्योतिष पद्धतींचा विचक्षणी व सखोल अभ्यास आहे. तत्त्वज्ञान, मानसशास्त्र आणि अध्यात्म या विषयांची असलेली ज्योतिष शास्त्राची सांगड उलगडून दाखवण्यासाठी ते विशेष ओळखले जातात. नक्षत्र ज्योतिष, पांचभौतिक सिद्धांत, मानस ज्योतिष, नवमांश फलित, दशांचे फलित यांत त्यांचे विशेष संशोधन आहे. ज्योतिर्विद्यावाचस्पति, नक्षत्रज्योतिष अलंकार, ज्योतिष भास्कर, ज्योतिष पंडित, ज्योतिष शास्त्री, मंत्र भास्कर, वास्तु पंडित आणि इतरही अनेक पदव्या विविध संस्थांनी त्यांना प्रदान केल्या आहेत.
त्यांनी गुरुगृही ऋग्वेदीय ब्रह्मकर्माचे शिक्षण घेतले. नंतर बी.कॉम्., एल्.एल्.बी., सी.एस्. असे शिक्षणही पूर्ण केले. ते हाडाचे शिक्षक असून वयाच्या चोवीस वर्षापासून ते ज्योतिष शिकवत आहेत.
ज्योतिष विषय विविधांगांनी, सखोलपणे पण अगदी सोप्या भाषेत शिकवण्याची त्यांची हातोटी आहे. त्यामुळेच ते विद्यार्थ्यांमध्ये फार प्रिय आहेत. “सर नुसते शिकवत नाहीत, तर विचारांचे अनेक पैलू आमच्यापुढे उलगडून आमचे जीवनच समृद्ध करतात” हा त्यांच्या विद्यार्थ्यांचा सार्वत्रिक अभिप्राय असतो. बहुधा याचसाठी, अनेक व्यावसायिक ज्योतिषी, ज्योतिष लेखक तसेच विविध संस्थांतील अनेक शिक्षकही त्यांच्या, ‘कोदंड पुनर्वसु’च्या अभ्यासवर्गांना प्रवेश घेत आले आहेत. यामागचे एकमेव कारण म्हणजे क्लासमध्ये, हातचे न राखता, मांडले जाणारे शुद्ध, दुर्मिळ, व अनुभूतीपूर्ण ज्ञान!
या व्यतिरिक्त, अभ्यासकांना शास्त्र व अनुभूतीच्या आधारे असलेले आणि आजवरच्या साहित्यात अजिबात न सापडणारे, यथार्थ, सखोल ज्ञान मिळावे या हेतूने ‘कोदंड पुनर्वसु फलज्योतिष ग्रंथमाला – फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम’ ही ग्रंथमालाही त्यांच्या हातून होत आहे. तिला सर्व स्तरांतील ज्योतिषांचा व अभ्यासकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे. गुरुवर्य श्री. व. दा. भट यांनी तर त्यांच्या लेखी पत्राने या ग्रंथांची तुलना भ.पू.पा. आदि श्रीशंकराचार्यांच्या भाष्याशी केली आहे यावरून या ग्रंथांचे महत्व लक्षात येईल. ज्योतिषांचे व अभ्यासकांचे उदंड अभिप्राय व प्रेम आजवर या ग्रंथांना लाभले आहे.