ग्रेस कधी कधी हे असेच क्षण चिरंतन राहावेत असे वाटते.एकांती, झाडाच्या बुंध्याला पाठ टेकून बसावे;हातात ग्रेस असावेत;आणि समोर आभाळभर पसरलेला सांजरंग….तोच केशररंग डोळ्यांतून पार रक्तात उतरावा.मग ग्रेसांची एक एक ओळ घेऊन चित्तडोहामध्ये सखोल बुडून जावे.....
पूर सांज निमाली, ढग भरले रे, अंधाराला पूर.अशा अवेळी तुझी आठवण, तुझे श्वास पण दूर !वादळवारा साहवे न मज, कितीक छळसी तूही ? हाती आहे तुझीच कविता, दूर तुझा पण सूर !ये ना लवकर, ये...
😆 प्रीतीची गझल 😆 जुनी वही चाळताना अस्मादिकांनी लिहिलेली एक प्रीतीची गझल काल सापडली, आणि मन टुण्णकन् उडी मारून भूतकाळात फिरून आले. झाले होते असे की अस्मादिक बारावीत असताना अकरावीत एका नवीन सौंदर्याने प्रवेश घेतला...