Only logged in customers who have purchased this product may leave a review.
फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम खंड ३: भाव व शुभ-अशुभ भावेश लेखक: वरदविनायक विजय खांबेटे
₹540.00
ग्रह-रास-भाव ही फलिताचा पाया ठरवणारी त्रिवेणी असते. ग्रह-राशींचे परिणाम जीवनाच्या कुठल्या अंगावर होतील ते ‘भाव‘ दर्शवतात. बाराही भावांचे कारकत्व या खंडात सविस्तर उलगडले आहे.
प्रत्येक लग्नाचे इष्ट-अनिष्ट भावेश हा तर सबंध फलज्योतिषाचा कणा आहे. पण अभ्यासकांकडून दुर्लक्ष होणारा भागही हाच आहे. हा भाग नीट कळल्याशिवाय एखाद्या ग्रहाची भूमिका मदत करण्याची आहे की त्रास देण्याची आहे हे ओळखता येणार नाही व फलिताची बांधणीही जमणार नाही.
केंद्र-कोण-मारक-उपचय इ. स्थाने म्हणजे नक्की काय ? षष्ठ उपचय म्हणून चांगले की दुःस्थान म्हणून वाईट? सप्तम केंद्रस्थान म्हणून शुभ की मारक म्हणून अशुभ ? कन्या लग्नाला शनी पंचमेश म्हणून चांगला की षष्ठेश म्हणून वाईट? दोन-तीन ग्रह एकत्र असता विचार कसा करायचा? दृष्टीचा विचार कसा करायचा? अशा अनेक शंकांचा उलगडा या ग्रंथाने होईल. हे नियम वापरायचे कसे ते कुंडल्या सोडवून दाखवले असल्याने तुमच्या विचारांना दिशा लाभेल.






Reviews
There are no reviews yet.